12 व्या शतकामध्ये जगद्ज्योती महात्मा बसवणणा यांनी लिंगायत धर्म स्थापन करून समाजातील अस्पृश्यता , न्याय , स्वतंत्र , समता, बंधुता या तत्वावर गळ्यात इस्टलिंग देऊन नवीन धर्माची स्थापना केली. त्यांनी बसव कल्याण येथे ७७० शरण एकत्र करून “अनुभव मंडप ” निर्मिती केली.
यामध्ये अनुभव मंडपचे पहिले अध्यात्म म्हणून “आलामप्रभू“,”सिध्दरामेश्वरम”, अक्क महादेवी, धानाम्मा देवी , यासारखे स्त्री पुरुष ७७० शरण निर्माण केले. कल्याण राज्य निर्माण करून वचन साहित्य निर्माण केले. राष्ट्रीय लिंगायत संघ भारत हि संघटना लिंगायत समाजातील सर्व प्रकारच्या जाती पोट जातीतील शरणाना एकत्र करून वचन साहित्य प्रचाराचे काम करीत आहोत. समाजाचे प्रश्न, शासकीय, निमशासकीय, राजकीय, शैक्षणिक, वधूवर तसेच ग्रामीण भागातील तळागाळातील लिंगायत समाजापर्यंत पोचविण्यासाठी काम करीत आहोत.
* उद्दिष्ट : *
- लिंगायत धर्माला साविधानिक धर्म मान्यता / अल्पसंख्याक दर्जा मिळणे.
- मंगळवेढा येथे “राष्ट्रीय दर्जाचे” महात्मा बसवाणण स्मारक होणे.
- केंद्र व राज्य शासनाकडून वेगवेगळ्या शैक्षणिक , धार्मिक, सामाजिक, राजकीय समस्या सोडवणे
- गाव तिथे इंजिनिअरिंग / मेडीकॅल कॉलेज, अनुभव मंडप, वृद्धाश्रम, आश्रमशाळा,वैद्यकीय आरोग्य निवारण केंद्रे,माहिती केंद्रे
- लिंगायत समाजातील वधू वरांचे प्रश्न सोडवण्यासाठी इव्हेंट / मेळावे घेणे.
* नियम व अटी *
- नाव नोंदणीसाठी वेबसाईट / अँप वरून ऑनलाईन फॉर्म भरू शकता किंवा ऑफिस मध्ये येवून देखील नोंदणी करता येईल.
- नाव नोंदणी फी : 500/- रुपये व प्रत्येक महिन्यासाठी फी :999/- आहे.
- नाव नोंदणी फी भरल्यानंतरच तुम्हाला स्थळांची पूर्ण माहिती मिळते.
- पसंतीनंतर मुलाचे / मुलीचे पै- पाहुणे, स्वभाव, वर्तुवणूक, व्यसन, स्थावर मालमत्ता, शैक्षणिक पात्रता, नोकरी, व्यवसाय इ. संबंधित माहिती आपल्या जबाबदारीवर करावी.
- आपण घेतलेल्या स्थळांची माहिती आपण स्वतः करून घ्यावी किंवा आपले मित्र, नातेवाईक यांच्यामार्फत करावी.भविष्यात कोणतेही प्रश्न किंवा अडचणी उद्धभवल्यास त्यास केंद्र जबाबदार राहणार नाही. तरी ती सर्व जबाबदारी सभासदांची आहे.
- लग्नांनंतर उध्दभवणाऱ्या चांगल्या अगर वाईट परिस्थितीस आपण केंद्रास जबाबदार धरू नये.
- नोंदणी केलेनंतर सभासदांनी आपल्या स्थळास मिळत्या जुळत्या व अनुरूप असलेल्या स्थळांची माहिती घेऊन त्यांच्याशी संपर्क साधावा.
- एकदा घेतलेली फी कोणतेही कारणास्तव परत दिली जात नाही.
- केंद्राकडून घेतलेल्या माहितीचा कोणीही गैरवापर करताना आढळल्यास त्याचे सभासदत्व रद्द केले जाईल व CyberCell Under कारवाई करण्यात येईल.
- मेंबरशीप रद्द करणे किंवा सभासदांना नवीन ऑफर्स देणे याबाबत अंतिम निर्णय केंद्राचे असतील.